पुणे

डुंबरवाडी येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

CD

ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून छात्राध्यापकांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा यासाठी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे व सचिव वैभव तांबे, प्राचार्य डॉ. गोविंद खरात, डॉ. रमेश काकडे उपस्थित होते.
सदर उपक्रमामध्ये महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण तक्ते, मॉडेल्स व भित्तिपत्रके तयार केली व त्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देणे व भविष्यासाठी उत्तम शिक्षक घडवणे यासाठी अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन उपयुक्त व फायदेशीर ठरते असे मत श्रीहरी तांबे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्नेहल वायकोस, प्रा. उमा काळे, प्रा. सारिका शेटे, प्रा. मीनाक्षी पालीवाल, प्रा. प्रियंका कडाळे, नीलेश बटवाल यांनी मोलाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसुदेव राऊत यांनी तर, आभार प्रा. रामदास कदम यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

Mumbai News: 'लालबागचा राजा'च्या दरबारात दुर्दैवी घटना! मंडपाजवळ ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'कोण होणार करोडपती' साठी डिझायनर साडीऐवजी पैठणीच का नेसली? माधुरी दीक्षितने दिलं खरं उत्तर, म्हणते-

Maharashtra Ganesh Visarjan Live: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गणरायाला भक्तिभावाने वाजतगाजत निरोप

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘वयोश्री योजने’चा थकलेल्या हातांना मोठा आधार जिल्ह्यात १७ हजार ज्येष्ठांना लाभ; प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग

SCROLL FOR NEXT