पुणे

हरिश्चंद्र गडावर पुण्यातील ट्रेकरचा मृत्यू

CD

ओतूर/जुन्नर, ता. ३ : पुणे परिसरातून हरिचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा जणांच्या गटामधील एका ट्रेकरचा खराब हवामानामुळे बुधवारी सकाळी (ता. २) मृत्यू झाला. अनिल ऊर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३२, रा. लोहगाव, पुणे), असे त्याचे नाव आहे. गडावरील दाट धुके, कोसळणारा पाऊस व बोचऱ्या थंडीमुळे आजारी पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत गडावर ट्रेकरला मार्गदर्शन करणाऱ्या खिरेश्वर (ता. जुन्नर) येथील बाळू रेंगडे यांनी सांगितले की, पुणे परिसरातून अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रेय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरीओम विठ्ठल बोरुडे (वय १५) व अनिल ऊर्फ बाळू नाथाराव गिते (सर्व सध्या रा. लोहगाव) या सहा जणांचा गट मंगळवारी दुपारी खिरेश्वर गावातून हरिचंद्र गडाकडे गेला. दुपारी तीन वाजेदरम्यान ते तोलारखिंडीतून पुढे गेले. मात्र, नंतर ते वाट चुकले व भटकत राहिले. मंगळवारची रात्र त्यांनी एकत्र झाडाच्या व डोंगराच्या आश्रयाला काढली. पाऊस व थंडीमुळे गीते हा आजारी पडला. सकाळी सहा वाजता ते परत रस्ता शोधून मार्गस्थ झाले. मात्र, गिते याची तब्येत खूपच खराब झाली. सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर इतर पाचजण मृतदेह बरोबर घेऊन रस्ता पाहत मदतीसाठी फिरत राहिले. त्यानंतर त्यांच्या बरोबर असलेला १४ वर्षीय हरीओम विठ्ठल बोरुडे हाही आजारी पडला. त्यामुळे गिते याच्या मृतदेहासोबत दोघे थांबून इतर दोघे हरीओम याला बरोबर घेऊन मदतीसाठी फिरू लागले. शेवटी थकून एक जागी निवाऱ्याला बसले.
दरम्यान, याच परिसरात हरिचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी आलेला मुंबईचा गट पण रस्ता चुकला होता. त्यांना हरीओम व इतर दिसले. त्यांनी घडलेली सर्व हकिगत मुंबईच्या गटाला सांगून मदत पाठवण्याची विनंती केली. याच दरम्यान बाळू हे पंढरपूर व सोलापूरचे ट्रेकर घेऊन गडावरील मंदिराकडे जात होते. पुढे मुंबई गटाला ते दिसले. त्यांनी ‘तुम्ही स्थानिक आहात का?’ म्हणून विचारले व त्यांना पुण्याच्या ट्रेकरची माहिती दिली.
गडाची चांगली माहिती असलेले बाळू यांनी ते कोणत्या भागात आहे, हे लक्षात आले. त्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यासाठी फिरून मोठमोठ्याने आवाज देऊन पहिले. दरम्यान धुके कमी झाल्यावर त्यांच्यातील एक जण बाळू यांना दिसला. त्यांनी मित्र ओंकार ओक यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली व रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर बाळू हे मंदिराजवळ येऊन पोहे बनवून व बिस्कीट घेऊन परत त्यांच्या जवळ घेऊन गेले.
दरम्यान, रेस्क्यू टीमबरोबर बाळू यांचा भाऊ मारुती हाही आला. या रेस्क्यू टीममध्ये ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके व इतर कर्मचारी, जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य आणि तीन गावकरी, असे एकूण दहा जण गडावर त्यांचा शोध घेण्यासाठी गेले. तोलारखिंड जवळ असताना बाळू व त्यांचा संपर्क झाला. मात्र, त्यानंतर मोबाईल नेटवर्क कमी झाल्यामुळे त्यांचा रेस्क्यू टीमबरोबर संपर्क झाला नाही.
दरम्यान, बाळू यांना अंधारात बॅटरीचा प्रकाश दिसला. तो त्यांच्याकडे गेला. त्याला भाऊ मारुती रेंगडे, तोलारखिंडवर तैनात असलेले राजूर वनविभागाचे कर्मचारी विजय नाडेकर, गौरव मेमाणे, शरद भांगले, महादू भांगरे हे भेटले. त्यांना घेऊन तो मृतदेहासह इतर जेथे होते तेथे गेला. त्यानंतर वनविभाग व पोलिस यांच्याशी संपर्क केला. त्यांनी, ‘तुम्ही मृतदेह तेथेच सोडून सुरक्षित स्थळी राहा,’ असे सांगितले. त्यामुळे इतर ट्रेकरला सोबत घेऊन ते हरिश्चंद्रगडावरील मंदिर परिसरात असलेल्या रामनाथ भारमल यांच्या हॉटेलवर गेले. तेथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली. गुरुवारी सकाळी राजूर (ता. अकोले, जि. नगर) पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी पथक आले. त्यांनी अनिल गिते याचा मृतदेह हरिश्‍चंद्र गडावरून राजूर येथे नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT