पुणे

तांदळाच्या कलात्मक पिंडीच्या दर्शनासाठी रांगा

CD

ओतूर, ता. २१ ओतूर (ता.जुन्नर) येथे श्रावणी सोमवारनिमित्त कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर कोरड्या तांदळाची कलात्मक पींड तयार करण्यात आली होती. तिचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, अशी माहिती श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.

कपर्दिकेश्वर मंदिर सकाळी सहा वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. शिवलिंगावर अभिषेक व महाआरती अनंतराव चौगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गणेश डुंबरे व मित्र परिवार नारायणगाव, अरिहंत ट्रेडर्स नारायणगाव व पाचघर ग्रामस्थ यांस कडून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले तर पांडुरंग ताजणे, राजेश वाकर, नितीन शिंदे यांच्याकडून शालेय दिंडीच्या विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, संत तुकाराम महाराज यांचे गुरू चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शन भाविकांनी घेतले. पहिल्या श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त शालेय दिंडी
तसेच भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात उद्योजक रमेश डुंबरे यांनी सुशोभीकरण केले. प्रत्येक श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वर येथे यात्रा भरवली जातात असल्याची माहिती अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली. यात्रेनिमित्त मोठी गर्दी असल्याने ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, राजेंद्र डुंबरे, महेंद्र (गांधी) पानसरे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, यतीन शेटे, सचिन तांबे, पंकज डोके, पुजारी गोविंद डुंबरे, अनिलकाका तांबे, दत्तात्रेय शिंदे उपस्थित होते.

श्रावणातील शेकडो वर्षांची परंपरा
ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार करण्यात येणाऱ्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीसाठी भाविक कुणी नवसाचे तर कुणी श्रद्धेने, स्वेच्छेने तांदूळ देतात. हे तांदूळ रविवारी पारंपरिक वाद्यात वाजतगाजत भाविक भक्त मंदिरात आणून देतात. याच तांदळाने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

04592

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

धुरंधर ते नॅशनल क्रश झालेल्या उझैर बलोचची 'ही' आहे गर्लफ्रेंड, अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली...'आता दुनिया तुझ्यासाठी...'

Investment: भारतात गुंतवणुकीची क्रांती! 84% भारतीय आणि 56% महिला आता स्वतः घेतात आर्थिक निर्णय

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

SCROLL FOR NEXT