ओतूर, ता.३ : ‘‘ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत ताग, ऊस बेणे, ऊस रोपे, जिवाणू खते व व्हीएसआय उत्पादनांचा पुरवठा केला जातो. शाश्वत हमीभाव असलेल्या ऊस पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. भविष्यात उसाला प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही,’’ असे ग्वाही विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शेतकऱ्यांना केले.
पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) विघ्नहर कारखान्याच्या वतीने गुरुवारी (ता.२९) शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते की, कांदा, भाजीपाला, फुले आदी तरकारी पिकांना शाश्वत बाजारभाव मिळत नाही. यामुळे सर्वांनी ऊस लागवडीकडे वळावे.
दरम्यान, शेतकरी मेळाव्यास संसदरत्न, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भेट दिली.
यावेळी कृषिरत्न, कृषिभूषण डॉ. संजीव माने, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, जुन्नर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर (माऊली) खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा बँकेचे संचालक तुळशीराम भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, गुलाब पारखे, तुषार थोरात, अनंत चौगुले, प्रगतशील शेतकरी पंकज वामन, बाजीराव मानकर, एकनाथ डोंगरे, जयवंत डोके, मंगेश काकडे, नंदाताई बनकर, सुरेखा वेठेकर, सुरेखा मुंढे, लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, जितेंद्र बिडवई आदींसह विघ्नहरचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शेतकी अधिकारी संदीप जाधव व गणेश मोढवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.
कोविड काळामध्ये सर्व व्यवहार ठप्प असताना कारखाना सुरू होता. शाश्वत उत्पन्नासाठी ऊस पीक हे माध्यम आहे. १८० दिवसांऐवजी १२० दिवसात गाळप पूर्ण करणार आहे.
- सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना
05379
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.