पुणे

खामुंडीत बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

CD

ओतूर, ता. २ ः खामुंडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी दीपक ज्ञानेश्वर कोकाटे यांचा बैलगाडीला जुंपलेला बैल गाडीसह कठडा नसलेल्या विहित पडून ठार झाला. खामुंडी येथील सोमनाथनगर परिसरातील तेलदरा शिवारात त्याचा मुलगा प्रणव कोकाटे आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी त्यांची एक बैलगाडी घेऊन बुधवारी (ता. १) सायंकाळी गेला होता. जनावरांचा चारा बैलगाडीत घेऊन परतताना अचानक बैलाने कशाला तरी घाबरून मुसंडी मारली. बैलाने मुसंडी मारल्याने बैल हा गाडीसह जवळच असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. प्रणव ने प्रसंगावधान दाखवून बैलगाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी आळेफाटा येथील महालक्ष्मी क्रेनचे मालक किरण पुरी यांना संपर्क करून क्रेन बोलावून घेतली. रात्री उशिरा दीपक कोकाटे व बाबू कोकाटे यांनी क्रेनच्या साहाय्याने विहिरीत ५० ते ६० फूट उतरून खामुंडी गावातील तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बैलाचा मृतदेह आणि बैलगाडी रात्री १.३० च्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढली. शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पीडित शेतकऱ्याला आर्थिक भरपाई किंवा बैल शासनाकडून किंवा सामाजिक संघटनेकडून मिळावा, अशी मागणी होत आहे.

खामुंडी (ता. जुन्नर) ः कठडा नसलेली विहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

SCROLL FOR NEXT