पुणे

अनधिकृत होर्डिंग्जचे सांगाडे धोकादायक

CD

ओतूर, ता. १६ : ओतूर (ता. जुन्नर) शहर व नगर - कल्याण महामार्गावर कॉलेज रोड, ओतूर बसस्थानक तसेच महामार्गावर बनकरफाटा येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत लोखंडी होर्डिंग्जचे सांगाडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ओतूर शहरात नविन बसस्थानक, ब्राह्मणवाडा चौक, जुने बसस्थानक, बाजार समिती प्रवेशद्वार यांसह इतर ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे तर काही ठिकाणी लाकडी वास्यांच्या साहाय्याने लावलेले फ्लेक्स वादळी वाऱ्यात व पावसात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच नगर-कल्याण महामार्गावर ओतूर ते मढपर्यंत विविध व्यावसायिकांची होर्डिंगही धोकादायक आहेत. तसेच बनकरफाटा येथे फ्लेक्स लावण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी सांगाडे हे पत्र्याच्या टपऱ्यांच्या मागे व पुढे उभारलेली आहेत. या अनधिकृत मोठ मोठ्या होर्डिंग्ज कोसळल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे.

आळेफाट्यापासून ते माळशेज घाटापर्यंत नगर-कल्याण महामार्गावर प्रत्येक गावाच्या बसथांब्यावर व महामार्गाच्या कडेला कित्येक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्सचे जाळेच तयार झाले असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र यावर कोणत्याच यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने दिसून येते. तरी गाव आणि शहरे विद्रूप करण्यात या अनधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्सचा मोठा हात आहे. स्थानिक हितसंबधांमुळे आणि सामाजिक अनास्थेमुळे यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिस प्रशासनही मनुष्य बळाअभावी या अनधिकृत लोखंडी होर्डिंग्जवर कारवाई करताना दिसत नाही.

मुंबईत झालेली दुर्घटना इतरत्र टाळण्यासाठी महामार्ग प्रशासन व ग्रामपंचायतींनी संभाव्य धोका ओळखून होर्डिंग्ज व धोकादायक फ्लेक्सवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT