पुणे

शेतकऱ्यांवरील कर्जाच्या बोजाचे पाप सरकारचे

CD

ओतूर, ता.३ : ‘‘सरकार राबवीत असलेल्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवण्याचे पाप सरकारचेच आहे. कर्जबाजारी होऊन महिन्याला सरासरी २४० शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामुळे सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करण्यात यावा,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी राजू शेट्टी राज्य भर शेतकरी संपर्क अभियान राबवीत आहेत. यामुळे पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने त्यांचा बुधवारी (ता. ३) सत्कार करण्यात आला.
यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्ह्याध्याक्ष प्रमोद पानसरे, शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, स्वाभिमानीचे रोहिदास कुटे, सचिन थोरवे, भूषण औटी, मनोज शिंदे, कृषिभूषण पोपट हाडवळे तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ज्याप्रमाणे सरकारने गेल्या दहा वर्षात उद्योगपतींची कर्जे राईटप केली. त्याच प्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीड पट नफा हा शेतकऱ्या‍ला मिळणे गरजेचे होते. मात्र सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे तो अधिकच कर्जबाजारी झाला आहे. कर्ज माफी मिळाल्यास शेतकऱ्याला न्याय मिळेल.
- राजू शेट्टी, अध्यक्ष : स्वाभिमानी शेतकरी संघटना

058

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT