ओतूर, ता. ३ : डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात ९ डिसेंबर ते १६ डिसेंबर यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाचे ४८ वे वर्ष असल्याची माहिती ओतूर व डुंबरवाडी येथील पेपर विक्रेते नवनाथ औटी यांनी दिली. हरिनाम सप्ताहानिमित्त दैनंदिन पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ९ ते ११ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, रात्री ९ नंतर हरिजागर होणार आहे. यानिमित्त विशाल महाराज हाडवळे, केशव महाराज हगवणे, भागवत महाराज साळुंके, संदीपान महाराज शिंदे, सुखदेव महाराज चाळीसगावकर यांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी (ता. १४) दत्त जन्मानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत प्रेममूर्ती उमेश महाराज दशरथे, दुपारी ३ ते ५ या वेळेत शेरण्या वाटप व सायंकाळी पोपट महाराज कासारखेडकर यांची कीर्तने, तर रविवारी (ता. १५) पाडुरंग महाराज घुले व सोमवारी (ता. १६) सुनील महाराज झांबरे यांचे सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.