ओतूर, ता. ७ ः जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी त्यांचेसाठी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली.
वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तत्काळ उचलले असून जुन्नर वनविभागातील मेंढपाळांना शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी ४०० सौर दिवे आणि ४०० तंबू खरेदी केले असून मेंढपाळांना सदर वाटप करण्यात येत आहेत. सर्व तंबू आणि सौर दिवे उपलब्ध झाले. पहिल्या टप्प्यात जुन्नर तालुक्यात ८५ तंबूचे वाटप पूर्ण झाले. उर्वरित तंबू व सौर दिवे मेंढपाळांना आता उपलब्ध करून दिले जात आहेत, असे अमोल सातपुते यांनी सांगितले.
सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला, सर्पदंश तसेच पाऊस व थंडीपासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होणार असल्याचे मत ओतूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी व्यक्त केले. ६ डिसेंबर रोजी आळे, पिंपरी पेंढार, उंब्रज, वडगाव आनंद, बेल्हे, निमगाव सावा, मंगरूळ, पारगावतर्फे आळे, शिरोलीतर्फे आळे, सुलतानपूर, येडगाव, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, येथील वास्तव्यास असलेल्या शिवराम करगळ, लालू पोकळे, अविनाश तांबे, गोरेक कोळेकर, काळूराम करगळ, रोहिदास करगळ, साळू करगळ, बाळु साळू, राम कऱ्हे, गंगा कऱ्हे, हनुमंत माने, शिवाजी कोळेकर, सुनील कोकरे, वसंत चक्कर, नारायण कोळेकर, तुकाराम महादू, करे सहादू, पांडुरंग देवकर, भास्कर दुबे अशा एकूण ५५ मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप अमोल सातपुते यांच्या हस्ते केले.
सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल, याचे प्रात्यक्षिक कैलास भालेराव, वनरक्षक आळे, संतोष साळुंके, वनपाल खोडद व विशाल गुंड, वनरक्षक खोडद यांनी करून दाखवले. यावेळी निकिता बोटकर वन परिक्षेत्र अधिकारी, रेस्क्यू टीम मेंबर संतोष कुतळ, रोशन भोर, रवी केदार, खंडू वामन आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.