ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डुंबरवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा वार्षिकस्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. त्यात (ता. ३) ते (ता. ११) दरम्यान महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये-रांगोळी, सांस्कृतिक दिवस, सारी डे, कॅरॅक्टर डे, गॅंग डे, हॅलोवीण डे, ब्लॅक अँड व्हाइट डे, गायन, नृत्य, फॅशन शो, फन फेअर खाद्यपदार्थांचे स्टॉल. तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये - क्रिकेट, बुद्धिबळ, व्हॉलिबॉल, कॅरम, बॅडमिंटन, थ्रो बॉल अशा अनेक स्पर्धा पार पडल्याची माहिती प्राचार्य डॉ. गणेश दामा यांनी दिली.
सर्व उपक्रमांमध्ये विशेष कामगिरी पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. विद्यार्थी गुणगौरव, कर्मचारी सन्मान, जिमखाना समिती सन्मान असे अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थित होते, तसेच त्यांनी मनोगतही व्यक्त केले. ‘‘विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमात इतके पारंगत व्हावे की, औद्योगिक, शैक्षणिक, संशोधन, मेडिकल सारखे कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम स्थानावर त्यांना गौरविण्यात यावे,’’ असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट ग्लेनमार्क फार्मास्युटिकल मालेगाव सिन्नरचे उल्हास धुप्पड यांनी केले.
औषध निर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, फक्त त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता व संयम हवा असे व्हॉइस प्रेसिडेंट फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट ग्लेनमार्क फार्मास्युटिकलचे डॉ. नितीन देशमुख यांनी मत मांडले. शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ. रमेश काकड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
एम.जी.एम युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाकडून नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या डॉ. सुशील पालीवाल यांचा तसेच महाविद्यालयातील डॉ. अस्मिता गायकवाड, प्रो. वृषभ हुप्परगे, प्रो. सोहम घोडके, ग्रंथपाल सुवर्णा माडगूळकर, प्रवीण मिंडे, आर्यन देशमुख, तन्या हांडे यांचा सत्कार केला. डॉ. वैशाली अडसरे यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ब्राउझर २०२४-२५ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले. संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे व सचिव वैभव तांबे यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. सुमीत जोशी, डॉ. शीतल बिडकर, प्रो. अश्विनी गावडे, प्रो. संतोष कर्पे, प्रो. प्रणाली दांगट, प्रो. निशिगंधा जाधव, प्रो. ऋतुजा कोकणे, प्रो. अजिंक्य दिघे. डॉ. किरण महाजन, डॉ. अभिषेक मेहेर, अर्चना डुंबरे, वैभव फापाळे, सुनील फापाळे आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.