पुणे

जुन्नरमधील विद्युत मोटारी चोरणाऱ्या टोळीला अटक

CD

ओतूर, ता. १७ : येथील पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहकडी, खामुंडी परिसरातील विहिरी व नदी परिसरातील विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली.
याप्रकरणी केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), किशोर सुरेश काळे (रा. भोजदरी, ता. संगगनेर), राहुल विठ्ठल काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर), दीपक तात्याबा डोके (रा. सावरचोळ, ता. संगमनेर), सोबरन राजाराम चौहान (रा. घारगाव, ता. संगमनेर; मूळ रा. मध्यप्रदेश) व मेटल खरेदी व्यावसायीक विक्रमसिंग अमरसिंग राठोड (रा. आळेफाटा, ता. जुन्नर), मूळ रा. राजस्थान) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ हजार रुपये किमतीचे विद्युत मोटारीचे केबल जाळून त्यातून काढलेल्या १८ किलो वजनाच्या धातूच्या तारा, पाच हजार रुपये किमतीच्या विद्युत मोटारीचे काळे केबल, शंभर रुपये किमतीचे एक कटर, गुन्हा करताना वापरलेले वाहने एक लाख रुपये किमतीची दोन बजाज पल्सर मोटार सायकल, असा एकूण १ लाख १४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व अटक आरोपींना जुन्नर न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावली आहे.
ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमणे, पोलिस हवालदार महेश पटारे, बाळशीराम भवारी, नामदेव बांबळे, नदीम तडवी, विशाल गोडसे, सुभाष केदारी, श्यामसुंदर जायभाये यांनी संबंधित कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT