उद्धट, ता. १६ : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि निर्यातीतील अडथळ्यांमुळे केळीचे बाजारभाव प्रतिकिलो २ ते ३ रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे.
तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी, खते आणि मजुरीवर मोठा खर्च करून केळीची लागवड केली होती. हंगामाच्या सुरुवातीला २० ते २५ रुपये मिळणारा बाजारभाव आता अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दराची मागणी होत असल्याने अनेक बागायतदारांनी पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि रोगराईमुळे उत्पादनात आधीच घट झाली असताना, आता बाजारभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
बाजार समित्यांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांच्या मनमानीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून केळीला हमीभाव द्यावा आणि निर्यात सुलभ करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
केळीच्या लागवडीसाठी लाखोंचा खर्च केला, पण आता २-३ रुपये दरात मजुरीही निघत नाही. कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न आहे.
- शंभूराजे घोलप, केळी बागायतदार, पवारवाडी, ता. बारामती
00739
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.