पुणे

उंडवडीतून तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ

CD

उंडवडी, ता. ८ : परतीचा प्रवास करत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बऱ्हाणपूर, बनवाडी व उंडवडी सुपे सह परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा शुक्रवारी (ता. ७ ) सायंकाळी सात दरम्यान बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे मुक्कामी दाखल झाला होता. तर सकाळी उंडवडी सुपे येथे न्याहरी करून पुढे मार्गस्थ झाला. पालखीचे परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले.
बऱ्हाणपूर येथील रात्रीचा मुक्काम आटपून शनिवारी (ता. ८) सकाळी पूजापाठ करून पालखी सोहळा बनवाडी व उंडवडी सुपे येथे न्याहरीसाठी दाखल झाला होता. पालखीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. या वेळी शाळेतील मुले, महिला, ग्रामस्थ यांनी दर्शनाचा लाभ घेतला. गावकऱ्यांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना पिठले भाकरीचे भोजन देण्यात आले.
उंडवडी सुपे येथे भोजन केल्यानंतर थोडा विसावा करून पालखी सोहळा खराडेवाडी मार्गे दौंड तालुक्यात मार्गस्थ झाला. परतीचा पालखी सोहळा यंदा पाऊस नसल्याने कोरडा गेला आहे. पाऊस पडावा, यासाठी वारकरी विठुराया चरणी साकडे घालत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT