पुणे

बुडत्याला काठीचा आधार

CD

उंडवडी, ता. १८ : ‘बुडत्याला काठीचा आधार’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यय बारामती तालुक्यातील सोनवडीकरांना येऊ लागला आहे. सोनवडी सुपे ते बारामती या वर्दळीच्या रस्त्यावर गेल्या चार दिवसापासून विद्युत तारा लोंबू लागल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवत विद्युत तारांना ताण देण्यासाठी चक्क रस्त्यावर बांबूच्या काठीचा आधार दिला आहे.
सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील काळेवाडी येथील जुन्या वीजरोहित्रातून शेतीपंपांना विद्युत पुरवठा करणारे काही विद्युत खांब वाकडे झाले आहेत. तसेच तारांचा ताण कमी झाल्याने येथील वर्दळीच्या रस्त्यावर विद्युत तारा खाली लोंबू लागल्या आहेत. त्यामुळे ह्या तारा रस्त्याने ये-जा करणाऱ्या जड वाहनांना अडथळा निर्माण करत आहेत. या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून या रस्त्याने एस. टी. सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांसह कामगार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बस गावात येत नसल्याने दोन-तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील नादुरुस्त विद्युत तारा सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहेत. तसेच याठिकाणी उंच व जड वाहनांना वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही बाब स्थानिकांनी महावितरणच्या लक्षात आणून दिल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीची उपाययोजना म्हणून रस्त्यावरील विद्युत तारांना ताण देण्यासाठी बांबूची काठी लावून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. मात्र ती मलमपट्टी कुचकामी असून वेगात वारे वाहू लागल्यानंतर बांबूची काठी पडू शकते. त्यामुळे पुन्हा अचानक तारा खाली येऊन एखाद्या वाहनात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महावितरणचा अनागोंदी कारभार
या भागात यंदा पावसाळी पूर्व देख दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. परिसरात फक्त किरकोळ स्वरूपाची देखभाल दुरुस्तीची कामे करून महावितरणने या भागात बोळवण केली आहे. त्यामुळे महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. महावितरण कंपनीने तातडीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे अडचण
या परिसरातील नव्याने विद्युत खांब उभारावा लागणार आहे. तसेच काही ठिकाणी खांबाला दिलेला ताण तुटल्यामुळे विद्युत तारांचा ताण कमी झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. मात्र दोन दिवसात संबंधित विषय मार्गी लावण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू,’’ असे महावितरणचे कर्मचारी भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT