पुणे

अंजनगावमध्ये दुकानात दीड लाखाची चोरी

CD

उंडवडी, ता. १२ : अंजनगाव (ता. बारामती) येथे अज्ञात चोरट्यांनी भैरवनाथ किराणा दुकान फोडून एक लाख पाच हजार रोख रक्कम व ४५ हजार रुपयांचा दुकानातील माल लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ११) मध्यरात्री घडली. ही चोरीची घटना रविवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
याबाबत माहिती अशी की, येथील जालिंदर ज्ञानदेव वायसे यांच्या मालकीचे भैरवनाथ किराणा स्टोअर्स हे दुकान शनिवारी रात्री दहा वाजता वायसे यांनी बंद करून ते त्यांच्या वस्तीवरील घरी मुक्कामी गेले होते. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाला लागून असलेल्या बाजूच्या खोलीच्या मागच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून त्या खोलीत प्रवेश केला. आणि किराणा दुकानाची चावी शोधून काढली. त्यानंतर दुकानाचे शटरचे कुलूप खोलून दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानात ठेवलेली रोख रक्कम नव्वद हजार (नोटा) व पंधरा हजारांची चिल्लर तसेच दुकानातील ४५ हजारांचे कोल्ड्रिंक्सचे बॉक्स व बिस्किटचे बॉक्स घेऊन पसार झाले.
दरम्यान, सकाळी दुकानाचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुकानाच्या बाजूला असलेल्या ग्रामपंचायतीच्या सीसीटिव्ही कॅमेराचे फूटेज तपासले. याबाबत दुकानदार जालिंदर वायसे यांनी माळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रोन कॅमेराची चर्चा...
गेल्या चार-पाच दिवसांत परिसरातील गावात रात्रीच्या वेळी एक ड्रोन कॅमेरा आकाशातून फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. येथील किराणा दुकान चोरट्यांनी फोडल्यानंतर दिवसभर ड्रोन कॅमेराद्वारे चोरट्यांनी अंदाज घेऊन चोरी केली असावी, अशी चर्चा होती. या अज्ञात ड्रोन कॅमेरा कुणाचा आहे, याचा शोध पोलिसांनी लावावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT