पुणे

उंडवडी सुपेत खासदार सुळे यांची शिरसाई योजना आढावा बैठक

CD

उंडवडी, ता. ८ : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व योगेंद्र पवार यांनी शिरसाई योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला. या बैठकीत शेतकऱ्यांनी शिरसाई योजनेतील विविध अडीअडचणी मांडल्या.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, वनिता बनकर, सरपंच शोभा कांबळे, उपसरपंच अनिल गवळी, अक्षय गवळी अमोल गवळी, विठ्ठल जराड यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताने विजयी झाल्यानंतर खासदार सुळे यांचा कामकाजाला सुरवात केल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी जनाई शिरसाई योजनेच्या आढावा बैठकीत शिरसाईच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी विविध अडचणी मांडल्या. तसेच माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी देखील योजनेतील अडचणी व उपाययोजना मांडल्या.

यादरम्यान जनाई शिरसाई योजनेतील अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले, ‘‘जनाई शिरसाई योजना क्षमतेने चालविण्यासाठी आम्ही लक्ष घालणार असून केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार व लाभार्थी गावातील जानकार मंडळींची लवकरच स्वतंत्र बैठक लावण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT