उंडवडी, ता. २७ : अंजनगाव (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज फर्निचर यांच्यावतीने ग्रामस्थांना ८७० फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वराज फर्निचर मॉलचे सर्वेसर्वा व उद्योजक सुरेश परकाळे, पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, सरपंच प्रतिभा परकाळे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, हेमलता परकाळे, मिलिंद मोरे, सुभाष परकाळे, सुभाष वायसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. येथे दरवर्षी उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जातात. यावर्षी ग्रामस्थांना फळझाडांची रोपे वाटप केली. यामध्ये आंबा, नारळ व चिक्कू या रोपांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.