पुणे

अन्‌ शेतात ये-जा करण्याचा मार्ग झाला मोकळा

CD

उंडवडी, ता. १५ : खराडेवाडी (ता. बारामती) येथील एका शेतातील रस्ता बंद झाल्यामुळे परिसरातील १०० एकरातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांची सर्वच कामे ठप्प झाली होती. मात्र, तंटामुक्तीच्या पदधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सामंजस्याने मार्ग काढला. संबंधित शेतकऱ्यांनी देखील प्रतिसाद देत एकत्रित येत लोकवर्गणीतून रस्ता पूर्ण केला. त्यामुळे सर्वांचाच शेतात ये-जा करण्याचा मार्ग एकच दिवसात मोकळा झाला.

खराडेवाडी हद्दीतील केवडेमळा नजिक भापकरवस्तीवरील शेतकऱ्यांचा आपसातील गैरसमजुतीतून तीन - चार दिवसांपूर्वी शेतात जाण्याचा रस्ता बंद झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांनी या रस्त्यावरील मुरम काढून घेतला होता व संपूर्णतः वहिवाट केली होती. त्यामुळे येथील गट नंबर ९३, १०५, १०८, १०७, १०९, ११०, ११२, ११३, ११५, ११७, ११८, ११९ या शेतात ये - जा करण्यासाठी रस्ताच बंद झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. विशेष म्हणजे, खरीप हंगामातील पेरण्या व शेतीची पूर्व मशागतीची कामे थांबली होती. अखेरला, या रस्त्याचा वाद एकाच दिवसात मिटवून रस्ता खुला करण्यात येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नीलेश वाबळे व मधुकर भोसले यांना यश आले आहे.

तंटामुक्तीच्या निकालाचे कौतुक
सकाळी त्याच शेतात तंटामुक्ती समिती व संबंधित शेतकऱ्यांची बैठक पार पडून रस्त्याचा वाद मिटला आणि सायंकाळपर्यंत संबंधित सर्वच शेतकऱ्यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे एकत्रित येत लोकवर्गणीतून जेसीबी मशिन व ट्रॅक्टरच्या साह्याने रस्त्याचे मुरमीकरण करुन घेतले. आत्ता हा रस्ता सर्वांसाठी खुला झाला असून सर्वच शेतकरी गुण्यागोविंदाने पुन्हा एकत्रित आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे तंटामुक्तीचा एका दिवसात दिलेला निकाल आणि त्यानंतर झटपट झालेला रस्ता याचे कौतुक होत आहे.

02749

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT