उंडवडी, ता. १ : जराडवाडी (ता. बारामती) येथे सरपंच रत्नदीप जराड यांचा वाढदिवस विधायक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामस्थांना ५०० फळ रोपे व ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यात उंडवडी कडेपठार येथील श्री. भैरवनाथ जनसेवा विद्यालयातील ४१० विद्यार्थ्यांना व जराडवाडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.
या कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे, श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सचिव सतीश जराड, उंडवडी क.प. विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल जराड, पाणी वापर संस्थेचे सचिव दादा जराड, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक वल्लभ चौधरी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.