पुणे

पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

CD

उंडवडी, ता. ८ : बारामती तालुक्याच्या उंडवडी सुपेसह कारखेल भागात पाऊस लांबल्याने बाजरी, उडीद, मका, कांदा तसेच भाजीपाला पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत आहेत.
यंदा मे महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस जून व जुलै महिन्यात पूर्णता थांबला आहे. त्यामुळे खरिपातील पिके पाण्याला आली आहेत. बारामतीच्या जिरायती भागातील उंडवडी सुपेसह कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर, जळगाव सुपे, अंजनगाव आदी भागात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी बाजरी, उडीद, सोयाबिन, तूर, मका, कांदा तसेच चारा पिकांसह भाजीपाला व उसाची पिके घेतली आहेत.

मात्र, जून व जुलै महिन्यात हमखास पडणारा पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकरी पिके वाचविण्यासाठी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने पिके भरून घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी ढगाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे. दिवसभर ढग येतात, सुसाट्याचा वारा वाहत आहे. मात्र पाऊस येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

गेल्या वर्षी खरिपात वरुणराजाने वेळेवर हजेरी लावल्याने बाजरीसह पिकांना एकही पाणी द्यावे लागले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या हंगामात कमी खर्चात व कमी श्रमात बाजरीचे पीक हातात आले होते. यंदा मात्र बाजरीसह पिकांना पाणी देण्याची वेळ आली असून यामध्ये शेतकऱ्यांचे खर्च व श्रम सुरू आहेत.
- सुलोचना मोरे, सोनवडी सुपे
..................
02815

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar : धनखड हॉस्पिटलमध्ये आहेत की योगा करताहेत? एवढं तरी सांगा; कपिल सिब्बल यांनी अमित शाहांना पुन्हा डिवचले

Early Signs of Dementia: छोट्या-छोट्या गोष्टी विसरत आहात? डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या या ५ चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका

Ganesh festival २०२५: गणरायाचे स्वागत खड्ड्यातून! 'मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल टिका व आक्रोश; सोशल मीडियावर भावनांचा निचरा

'कॉमन सेन्स नावाची...' ट्राफिकमध्ये अडकल्याने सुमीत राघवन संतापला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला,'शेंगदाणे विकणारा दिसणारा दिसला की...'

Pune News : गणपतीला गावी जाणाऱ्यांच्या प्रवासात विघ्न संपेना, गाड्या कमी; प्रवासी स्वारगेट स्थानकातच....

SCROLL FOR NEXT