पुणे

प्रशासनावर मजबूत पक्कड असलेले नेतृत्व

CD

बोले तैसा चाले ... अशी ओळख असलेले नेते म्हणजेचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. राज्याच्या राजकारणासह प्रशासनावर मजबूत पक्कड असलेलं नेतृत्व म्हणूनही अजितदादांचं नाव सर्वश्रुत आहे.
- विजय मोरे, उंडवडी

राजकारण असो की, समाजकारण, कोणत्याही विषयात दादांनी एकदा शब्द दिला की, तो विषय मार्गीच लागला. असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे अजितदादा ‘बोले आणि दल हले’ असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. या विकास पुरुषाला देखील जनतेने गेली अनेक वर्ष मोठ्या मताधिक्याने स्वीकारले आहे.

अजितदादांच्या कामाची पद्धत अनेकांना न्यात आहे. दादा, पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागतात. वेळेला न्याय देणारे नेतृत्व दादांनी पूर्वीपासून जपलेलं आहे. त्यांच्या स्पष्ट वकत्याव्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींना सामोरे देखील जावे लागले. त्यामध्ये त्यांनी पुन्हा सुधारणा करून उमेदीने तेवढ्याच ताकदीने उभे राहिल्याचे त्यांना सर्वांनीच पाहिले आहे. सभा, समारंभ असो की, नवीन सुरू असलेले प्रकल्प किंवा शासकीय इमारती तसेच भेटी- गाठी आदींची वेळ देखील सकाळच्या पहारी लवकर ठरलेली असते. त्यामुळे अनेकांची पळापळ होत असते. दादा, नेहमीच वेळेला महत्त्व देत आले आहेत. दादांच्या कामकाजाची पद्धत अनेकांना भुरळ घालते. त्यामुळे जिथे दादा, तिथे गर्दी होत असते.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे, जराडवाडी, सोनवडी सुपे, उंडवडी कडेपठार व बऱ्हाणपूर या पाच गावांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याला सभासद करून घेतो, असा शब्द यापूर्वी दादांनी दिला होता. त्याप्रमाणे ही गावे तीन वर्षापूर्वी माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बसवून तो शब्द पूर्ण केला. त्यानुसार यावेळी पाच गावातील सभासदांनी देखील अजितदादांवरील प्रेम मतदान पेटीतून दाखवून दिले. यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उंडवडी कडेपठार येथील प्रचार सभेत अजितदादांनी बारामतीतील जिरायती हा शब्द पुसणार असा शब्द दिला आहे. त्यानुसार दादांनी कामकाजाला सुरवात देखील
केलेली आहे.

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व गावांना मिळावे, यासाठी योजनेच्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी तसेच योजनेचे पंप सौर ऊर्जेवर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच नीरा - कऱ्हा नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे जिरायती भागातील शेती मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली येईल. व त्यामुळे बारामतीतील जिरायती हा शब्द देखील पुसला जाईल, असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.
राज्याच्या राजकारणावर अजितदादांनी पक्कड घातल्यापासून बारामतीचा वेगाने कायापालट बारामतीकरांना अनुभवायास मिळाला. यामध्ये खेडोपाडी शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था रस्ते सुधारणा, वीजव्यवस्था, शासकीय कार्यालयांच्या इमारतीसह विविध सुधारणा करणे, याबाबत दादांनी अभ्यासपूर्वक व दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा जनतेला आजच होऊ लागला आहे. यापुढील पिढीला सर्वाधिक होणार आहे. तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, पाणी, शेतीपूरक व्यवसाय आदी विषय दादांनी हातळले आहेत. यामध्ये मोठी क्रांती पुढील काळात होणार आहे. त्यामुळे बारामती विधानसभेच्या माध्यमातून लाभलेलं नेतृत्व हे बारामतीकरांचे नशीब उलगडणारे ठरणार आहे. हे मात्र निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाच्या शाही विसर्जन सोहळा

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT