उंडवडी, ता. १३ : बदलत्या हवामानामुळे बारामती तालुक्याच्या जिरायती भागात गुलछडी पिकावर लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
यामुळे उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, खराडेवाडी परिसरातील श्रावणी हंगामात गुलछडीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
कोरडवाहू भागात छोट्या शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेल्या गुलछडीच्या पिकावर गेल्या पंधरावड्यापासून लाल कोळीची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या भागातील गुलछडीची फुले विक्रीसाठी दररोज सकाळी पुण्यातील बाजारात जातात. गुलछडीच्या फुलांचे पैसे शेतकऱ्यांना आठवड्याला मिळतात. यातून छोट्या शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो. मात्र, गुलछडीला लाल कोळी रोगाने घेरले आहे. उत्पादन घटल्याने फूल उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
पीक सुधारण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
गौरी - गणपतीत फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे गुलछडीसह विविध फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे गुलछडीच्या फुलांना वर्षभरातील सर्वधिक बाजारभाव मिळतो. मात्र हंगाम तोंडावर असताना गुलछडीच्या फुलांमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी गुलछडीच्या पिकावर विविध उपाय योजना करत आहेत. मात्र या पिकाची सुधारणा कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गुलछडीच्या फुलांना गेल्या तीन-चार दिवसांपासून १५० रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत आहे. मात्र, एकीकडे बाजारभाव वाढला आणि दुसरीकडे गुलछडीवर रोग पडल्याने फुलांचे उत्पादन कमी झाले. या रोगामुळे गुलछडीची पात पिवळी पडत आहे. फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे फुले कमी निघत आहेत.
- माणिक पानसरे, गुलछडी उत्पादक, सोनवडी सुपे (ता. बारामती)
लसूण अर्काची फवारणी उपयुक्त : करंजे
शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या किडीवर लक्ष ठेवून प्रतिबंधक उपाय करावेत. गुलछडी पिकात हवा खेळती राहावी, यासाठी काळजी घ्यावी. प्रादुर्भाव झालेली पात काढावी. लाल कोळी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी निम ऑइल सोप फवारावे. जास्त प्रादुर्भाव असेल तर केलेथॅन किंवा दिकोफॉल १.२ टक्के प्रती लिटरला २ एम. एल फवारावे. ॲबामॅक्टीन घटक फार उपयोगी आहे. तसेच जैविक उपायामध्ये लेडीबग क्टिल सोडावे. किंवा बिवेरीया बासीयानाची फवारणी करावी. लसूण आर्कची फवारणी देखील यासाठी खूप उपयोगी ठरते, अशी माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष करंजे यांनी दिली.
02894
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.