पुणे

उंडवडी सुप्याला स्मार्ट मीटरमध्ये पहिले स्थान

CD

उंडवडी, ता. ४ : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे गावाने स्मार्ट मीटर प्रकल्पात पहिले स्थान पटकावले. महावितरण कंपनीने येथील सर्व ३६६ वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवून संपूर्ण गाव शंभर टक्के स्मार्ट केले आहे. राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला गती देत बारामती सर्कलमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उंडवडी सुपे येथे केवळ १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमात उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव, सहाय्यक अभियंता वाय. डी. तळे तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ किशोर मस्तूद यांनी विशेष परिश्रम घेतले. स्मार्ट मीटर बसविल्याने गावातील घरगुती वीज जोडणी तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाली आहे. यामुळे बिलातील चुका, रीडिंगची गैरसोय आणि तक्रारींचे निवारण जलद होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

स्मार्ट मीटरचे फायदे...
दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८० पैशांची सवलत
स्वयंचलित रीडिंगमुळे अचूक बिल
बिल दुरुस्तीवरील अतिरिक्त खर्च टळणार
महावितरण ॲपवरून तासागणिक रीडिंगची सुविधा
स्मार्ट मीटर पूर्णपणे विनामूल्य
सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या ग्राहकांसाठी वापरलेली व शिल्लक ऊर्जा स्पष्ट
मीटरला १० वर्षांची वॉरंटी
ॲपद्वारे तक्रारींचे घरबसल्या निवारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

Viral Video: ''रोज दारु पितोस.. दारु पिऊनच गाडी चालवली असणार'', जखमी बॉयफ्रेंडच्या आईसमोरच गर्लफ्रेंडचा पारा चढला

Fire News: भीषण आग! सुक्या अन्न गोदामात अग्नितांडव; ७ जणांचा मृत्यू, २० कामगार बेपत्ता, घटनेनं खळबळ

एक- दोन नाही तर तब्बल 200 वर्षांनी बनतोय त्रिग्रही राजयोग ! येत्या 6 दिवसांत तीन राशींना येणार सोन्याचे दिवस

Latest Marathi news Update: आंबेडकर जयंतीमध्ये मी कायम पुढाकार घेतो- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT