पुणे

बऱ्हाणपूरमधील विद्यार्थ्यांसाठी हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळा

CD

उंडवडी, ता. ४ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील बारामती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी व एचपीएलसी या विश्लेषण तंत्रांवर आधारित दोन दिवसीय हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील बी. फार्मसीच्या २६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित या उपक्रमात पहिल्या दिवशी सैद्धांतिक सत्र झाले. अमाटेरासू लाईफ सायन्सेसच्या मयूरी गोफणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या तंत्रांच्या मूलभूत संकल्पना व औषधनिर्मितीतील उपयोग स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. धनंजय घोडके यांनी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. दुसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांवर काम करण्याची संधी मिळाली. एचपीएलसी प्रशिक्षण डॉ. श्रीकृष्ण बावकर व प्रेरणा बेंदगुडे यांनी, तर यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी मार्गदर्शन प्रा. अभिजित शितोळे व सुयश गायकवाड यांनी केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

03234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ जून २०२४ चा धक्का ते ४ मे २०२६ चा दमदार कमबॅक! भाजपने २३ महिन्यांत भारताचे राजकीय चित्र कसे बदलले? मोदींची राजकीय कमाल

Assembly election results 2026 Live Update : ४ मई, टीएमसी गई; भाजप मुख्यालयात विजयाचं सेलिब्रेशन

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Baramati Vidhansabha Election Result : सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; भारतात प्रस्थापित केला मताधिक्याचा नवा विक्रम

येत्या 10 दिवसांमध्ये बदलणार 6 राशींचं नशीब ! शनिश्चरी अमावस्येपासून मिळणार मोठं यश आणि धनप्राप्ती

SCROLL FOR NEXT