पुणे

कुंजीरवाडी ग्रामपंचायतीकडून वारकऱ्यांसाठी विविध सुविधा

CD

उरुळी कांचन, ता. १२ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अतिशय भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतीकडून वारकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने महामार्गाची दुतर्फा सफाई करून मोफत पाणी व्यवस्था केली होती. ओला व सुका कचरा इतरत्र पडू नये, म्हणून कचरा कुंडी व्यवस्थापन केले होते. गावात येणाऱ्या वारकरी दिंडीची व्यवस्था शाळा, मंदिर व मंगल कार्यालय येथे केली होती. हरित वारीद्वारे कुंजीरवाडी गावात ग्रामपंचायत व पर्यावरण समितीच्या वतीने वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
यावेळी सरपंच अंजू गायकवाड, उपसरपंच अजय कुंजीर, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर पाटील, ग्रामविकास अधिकारी सविता भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या सुमन कुंजीर, साधना कुंजीर, माजी उपसरपंच संतोष कुंजीर, नाना कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, काळूराम कुंजीर, संदीप धुमाळ आदींनी पालखीचे स्वागत केले.
आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांनी माहिती दिली की, पालखीनिमित्त शासनाच्या वतीने हिरकणी कक्ष उभारला होता. याचे नियोजन अंगणवाडी कर्मचारी यांनी केले; तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य पथके तयार केली. तसेच, उन्हामुळे उष्माघात होऊ नये म्हणून याची खबरदारी म्हणून विसावा कक्ष उभारले होते. तसेच वारकऱ्यांची तपासणी करून औषधोपचाराची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT