पुणे

लोणी काळभोर येथील दोन सराईत स्थानबध्द

CD

उरुळी कांचन, ता. १८ : लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाणे परिसरात नागरिकांना धमकी देत त्यांना शिवीगाळ, मारहाण करून दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एका वर्षाकरिता अमरावती व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. संजय नेहरू राठोड (वय ४५, काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे), विवेक बबलू यादव (वय ३६, रामदरा रोड, बल्लाळवसी, ता. हवेली, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.
राठोड आणि यादव हे दोन्ही आरोपी पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करून विक्रीचा व्यवसाय करत होते. हातभट्टी गावठी दारू व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना धमकी देत शिवीगाळ करणे, मारहाण करून परिसरात आरोपींनी दहशत निर्माण केली होती. गुंडगिरी प्रवृत्तीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या दोन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्त यांना पाठविला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी संजय राठोड यास अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणि विवेक यादव याला नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलिस हवालदार गणेश सातपुते, पोलिस नाईक संदीप धनवटे, पोलिस नाईक भोसले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारकडून NA प्रक्रियेत मोठा बदल! आता चकरा संपणार; सर्व काही होणार डिजिटल, उत्खनन रॉयल्टीही माफ

Iran-America War: इस्लामाबादमध्ये दोन दिवसांची सुट्टी! युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तान फुल्ल तयारीत

Yuvraj Singh : तू आणखी ३ ते ६ महिने जगू शकतोस... युवराज सिंगला डॉक्टरांनी सांगितले; माजी खेळाडू म्हणाला, मेलो तरी चालेल, पण...

Crime: पतीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर प्रियकरानंही सोडलं; निराशेतून १९ वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं

Latest Marathi News Live Update : राहुरीत बिनविरोध नाहीच...सात उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT