पुणे

शुल्क न भरल्याने बसवले ग्रंथालयात

CD

उरुळी कांचन, ता. २६ : शाळेचे शुल्क गेल्या दोन-तीन वर्षांपासून न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना शाळेतील ग्रंथालयात बसून ठेवण्यात आल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ‘एंजल हायस्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत घडली.
शाळेचे शुल्क न भरलेल्या जवळपास ३० विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. २४) ग्रंथालयात बसून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता पालकांनी या शाळेवर मोर्चा काढला होता.
यावेळी शाळेचे अवाढव्य शुल्क, शाळेला खेळासाठी मैदान नसणे, शाळेचे अनधिकृत बांधकाम, नियमबाह्य शिक्षक भरती असे अनेक गंभीर आरोप पालकांनी शाळेवर केले.
याबाबत प्राचार्या शमशाद कोतवाल म्हणाल्या, ‘‘शाळेचे मुख्य व्यवस्थापक सचिन अग्निहोत्री हे स्वतः पालकांना भेटले आहेत. कोरोना काळात पालकांकडून शुल्क आकारण्यात आले नाही. ज्या पालकांच्या पाल्यांना ग्रंथालयात बसवले होते, त्यांनी गेले २ ते ३ वर्षे शुल्क भरलेले नाही. आपण अशा पालकांना ४ टप्प्यात शुल्क भरण्याची सवलत दिली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

CSK vs SRH: 'Dhoni चेन्नईत सामना खेळणार नाही, कारण...', सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं; पण चाहते होतील नाराज

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

SCROLL FOR NEXT