पुणे

लोणी काळभोर येथील बाजारातील पत्राशेड पाडून गाळे बांधण्यास विरोध

CD

उरुळी कांचन, ता. १३ : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनाने येथील आठवडे बाजार पत्राशेड पाडून त्या ठिकाणी नवीन व्यावसायिक गाळे बांधण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला होता. मात्र, मनमानी कारभार करून सुस्थितीत असलेले आठवडे बाजार पाडून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांच्या वतीने हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे, तसेच जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना या विषयीचे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे.


प्रशांत काळभोर यांनी सांगितले की, लोणी काळभोर ग्रामपंचायत गट क्रमांक १३ येथे आठवडे बाजार असून, त्या ठिकाणी अर्ध्या बाजारावर पत्राशेड उभारणी केली आहे. सध्या ती जागा आठवडे बाजारासाठी अपुरी पडत असून शेतकऱ्यांना विक्री करताना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत आठवडे बाजार पाडून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्याचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केलेले आहे. पत्र्याचे शेड पाडल्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार आहे. सुमारे ५० ते ७० लाख रुपये निधी खर्च करून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. या पत्राशेडचे आयुष्य किमान पंचवीस वर्षे असताना ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी कारभार करीत असतील, तर अशा निर्णयांना आमचा आणि सर्व ग्रामस्थांचा याला विरोध आहे. ग्रामपंचायतीने मनमानी पद्धतीने काम चालू केल्यास त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल.

लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले की, दर शनिवारी या जागेवर आठवडे बाजार भरतो. या जागेवर अर्ध्या भागात पत्राशेड उभारणी केली आहे. आठवडे बाजाराची भिंत लोणी काळभोर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून आहे. परिणामी बाजाराच्या वाहतुकीसाठी हा रस्ता रुंदीला कमी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही भिंत पंधरा ते वीस फूट मागे सरकवावी, असा प्रस्ताव मासिक सभेत सभासदांनी मांडला होता. आठवडे बाजार पत्राशेड पाडून त्या ठिकाणी नवीन व्यावसायिक गाळे बांधून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, बसण्याचे कट्टे अशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायत सदस्यांकडून आल्या होत्या. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन ग्रामस्थांकडून लेखी हरकती मागवल्या होत्या. यावर पुन्हा चर्चा करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT