पुणे

उरुळीत मिळणार ‘बाल संस्कारा’चे बाळकडू

CD

उरुळी कांचन, ता. ३ : सुसंस्कारित आणि आदर्श पिढी व मानवी जीवनाचे भवितव्य घडविणे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्रीकृष्ण सेवा मंडळ आयोजित ‘श्री राऊळ बालसंस्कार शिबिर महंत गिरीशराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून रविवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. १०) या दरम्यान आयोजित केले आहे.

या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, श्रीमदभगवदगीता पठण, स्तोत्र पठण, धर्म संस्कार मुलांचे भावविश्व, वक्तृत्व, मुक्तांगण ज्ञानयोग साधना, ईश्वर कार्याची ओळख, महानुभाव तत्वज्ञान, नैतिक मूल्य, आचार-विचार प्रणाली, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी उपक्रम संपन्न होणार आहेत.

याबाबत माहिती देताना महंत गिरीशराज शास्त्री म्हणाले, की बाल संस्कार ही आजच्या काळाची गरज. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी व आदर्श बनते. महानुभावांची संस्कृती, इतिहास, विविध स्तोत्रे, आरती, महानुभाव तत्वज्ञान, नितिपर कथा, उत्तम चरित्र व योग्य आचरण यांचे बाळकडू देण्यासाठी बालमन हा एक आदर्श काळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक

धर्मेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चेवर सनी-बॉबी देओल यांना वाटलेली लाज, हीमॅन सगळ्यासमोर म्हणालेले, 'माझ्या मागे रोज...'

Holi 2026 ला टेक्नॉलॉजीचा तडका! रंगपंचमीला इलेक्ट्रिक पिचकारी ते वॉटरप्रूफ मोबाईल पाउचपर्यंत; हे 10 गॅजेट्स होळीला देणार नवा रंग

Horoscope 2026: मार्चमध्ये ‘या’ 3 राशींचा लागणार जॅकपॉट! पण काहींसाठी वाढणार अडचणी

Amravati Crime : माझी हो...अन्यथा जाळून मारेल! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १० वीच्या विद्यार्थिनीला धमकी; परीक्षा केंद्रासमोरच राडा

SCROLL FOR NEXT