पुणे

उरुळी येथील बंद घरातून तीन लाखांचे दागिने चोरी

CD

उरुळी कांचन, ता. १ : भरदिवसा बंद दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे सोने चोरून नेल्याची घटना उरुळी कांचन येथे शुक्रवारी (ता. ३१) दुपारी सव्वादोनच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत नारायण श्रीधर कुंभार (वय ६१, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय हे शुक्रवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता कौटुंबिक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. फिर्यादी यांनी आत जाऊन पहिले असता बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉकर उचकटून त्यामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ४० हजार रुपये किमतीची सोन्याची ठुशी, ६० हजार रुपये किमतीची मोहनमाळ, ४० हजार रुपये किमतीची अंगठी, ८० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, ४० हजार रुपये किमतीचा लक्ष्मीहार, ४० हजार रुपये किमतीचे कानातले, असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

सगळ्यांसमोर रणवीरने शेफालीला उचलताच भडकली दीपिका, सोशल मीडियावर VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

SCROLL FOR NEXT