पुणे

उरुळी कांचन येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

उरुळी कांचन, ता. ६ : एका पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील तुपे वस्ती येथे बुधवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

राहुल रावसाहेब जाधव (वय २५, रा. उरुळी कांचन, तुपे वस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचे नाव असून या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत रमेश रावसाहेब जाधव (वय ३७, रा. उरुळी कांचन, तुपे वस्ती, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जाधव आणि त्यांचे भाऊ रमेश जाधव हे कुटुंबीयांबरोबर उरुळी कांचन परिसरातील तुपे वस्ती येथे राहण्यास आहेत. त्यांचा फिरतीचा भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रमेश जाधव हे घरी आले असताना त्यांना त्यांचे भाऊ राहुल यांनी घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT