पुणे

देसाई महाविद्यालयात रंगला खाद्यभ्रमंती महोत्सव

CD

उरुळी कांचन, ता. १५ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त खाद्यभ्रमंती महोत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमात १५०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत विविध खाद्यपदार्थांचे ३५हून अधिक स्टॉल लावले. त्या स्टॉलच्या स्पर्धेत तेजस फरतडे, ओमकार जाधव, प्रथमेश देवकाते व रोहन कुंजीर या संगणकशास्त्राच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली.
या महोत्सवात चुलीवरची ज्वारी व बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, पिठले, वांग्याचे भरीत, पुरणपोळी, मोदक असे एकाहून एक स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध होते. या पदार्थांचा विद्यार्थी व प्राध्यापकांनी मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश भोसले, विश्‍वस्त संभाजी कांचन व प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी कांचन म्हणाले की, खाद्यभ्रमंती हा सांस्कृतिक वारसा व परंपरा जतन करणारा उत्सव असून त्या त्या प्रांतातील खाद्यसंस्कृतीशी त्याची नाळ जोडलेली असते. म्हणूनच जंकफूड आवडीने खाणाऱ्या युवा पिढीसाठी असे उत्सव महाविद्यालयांनी अवश्य आयोजित करावेत.
प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी या उपक्रमातून व्यवस्थापन, विपणन, अर्थशास्त्र, ग्राहक यासंबंधीचे शिक्षण व प्रशिक्षण मिळत असल्याचे असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी रानवडे व प्रतिक्षा कोद्रे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT