उरुळी कांचन, ता. ४ : मारहाणीची तक्रार देऊन चोवीस तास उलटूनही संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याने उरुळी कांचन (ता. हवेली) पोलिस ठाण्यामध्येच एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
सोरतापवाडी येथे अवैध मटका जुगाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका व्यक्तीला अवैध मटका चालकाने शनिवारी (ता. १) रात्री मारहाण केली. याबाबत मारहाण झालेल्या व्यक्तीने उरुळी कांचन पोलिस ठाण्याला माहिती दिली. मात्र, घटनेला चोवीस तास उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने संबंधित व्यक्तीने उरुळी कांचन पोलिस ठाण्यावर चढून पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टाळला. त्यानंतर रवींद्र सुखदेव अवचट (वय ३५, रा. नायगाव, ता. हवेली), विनोद जगन्नाथ लोंढे (वय ३८, रा. नायगाव), सुनील भगवान खलसे (वय ३८, रा. कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली), वसंत दत्तात्रेय लोंढे (वय २७ रा. कुंजीरवाडी- माळवाडी), सर्फराज शहानूर मनीयार (वय ३०, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), शरद विठ्ठल कर्डे (वय ३२, कुंजीरवाडी- मगरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींकडून पत्त्याच्या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ३ हजार ७०० रुपये जप्त केले. याबाबत पोलिस कर्मचारी सुमीत वाघ यांनी फिर्याद दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.