उरुळी कांचन, ता. २ : विवाहितेसमोर उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करणाऱ्या विकृत व्यक्तीस लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी अटक केली. समीर शहाजहान मुकेरी (वय ३४, रा. कोरेगावमूळ, ता. हवेली), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वीस वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मुलगी या मंगळवारी (ता. १) दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या माहेरी जाण्यासाठी लोणी स्टेशन परिसरात रिक्षासाठी थांबल्या होत्या. त्यानंतर लोणी स्टेशन परिसरातून त्या रिक्षात बसल्या. काही अंतरावर रिक्षा गेल्यानंतर शेजारी बसलेला आरोपी समीर मुकेरी याने फिर्यादी यांच्याकडे बघून अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करण्याचा विकृत प्रकार केला. रिक्षा चालकाच्या हे लक्षात आल्यानंतर लगेच रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. आरोपी रिक्षातून उतरल्यानंतर फिर्यादींना, ‘तुझ्याकडे बघून घेईल,’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली.
सदरची कारवाई लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलिस उपनिरीक्षक रूपाली जाधव यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.