पुणे

टेम्पोच्या धडकेत दोन प्रवासी ठार

CD

उरुळी कांचन, ता. ३ : भरधाव टेम्पोने सेवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना जोरात धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे- सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी (ता. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) व अशोक भीमराव (वय २५, रा. बसनाळ सावली, बिदर, कर्नाटक), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर, लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०), भागवत पेरू बनसोडे (वय ४०, दोन्ही रा. सोरतापवाडी, ता. हवेली), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत जमीर महबूब मीयाडे (वय ३३, रा. सहजपूर) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूब मियाडे, अशोक भीमराव, लक्ष्मण भारती, वैशाली बनसोडे, भागवत बनसोडे, मैनुदिन तांबोळी हे सर्व प्रवासी तळवाडी चौकातील बस थांब्यावर बुधवारी (ता. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बससाठी उभे होते. त्यावेळी भरधाव येणारा टेम्पो (क्र. एम.एच. ४५ टी. १८७९) मुख्य रस्ता सोडून प्रवाशांच्या दिशेने गेला. त्यात मियाडे आणि भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवासी जखमी झाले. त्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरारी झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yajna Ritual: खळबळजनक ! देवाचं बोलावणं आलं, २० भाविक देहत्याग करणार; पुण्यातील भाविकांचाही समावेश, नेमकं काय घडलं?

GST Reform: GSTतील बदलामुळे सरकारला बसणार 40,000 कोटींचा फटका; नवे दर दिवाळी नाही तर 'या' दिवशी लागू होणार

Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पुण्यातील मंडळांचे आकर्षक देखावे सज्ज

आदिनाथ कोठारेचा नवा अवतार! पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

RBI: रिझर्व्ह बँकेचा खातेदारांना दिलासा!

SCROLL FOR NEXT