पुणे

मित्राचे दागिने ठेवले गहाण

CD

उरुळी कांचन, ता. ४ : लग्नात दागिने घालावयाचे आहेत, अशी खोटी बतावणी करून मित्राकडून घेतलेले साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने एका खासगी फायनान्समध्ये गहाण ठेऊन १० लाख रुपये घेतले. मात्र, मित्राने पुन्हा दागिने मागितल्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आकाश दिलीप काळभोर (वय २७, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय गोविंद चौधरी (वय ३१, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी फिर्यादी दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश काळभोर व अक्षय चौधरी हे दोघेजण मित्र असून, त्यांच्यात नेहमी पैशाची देवाणघेवाण होत असे. १५ एप्रिल रोजी आकाश याने अक्षय याला फोन करून नातेवाइकांच्या लग्नाला जायचे असल्याने तुझे आणि तुझ्या आईचे सोन्याचे दागिने लग्नामध्ये घालण्याकरिता दे. लग्न झाल्यानंतर ते दागिने तुला पुन्हा परत करतो, असे आकाश याने सांगितले.
फिर्यादी अक्षय यांनी आपल्याकडील सोळा लाख रुपये किमतीचे साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने आकाश काळभोर याला दिले. त्यावेळी तिथे मित्र यश अशोक यादव हे उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी आकाश याला दिलेले दागिने अक्षय यांनी परत मागितले असता आकाश याने सोन्याचे दागिने देण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादींनी आरोपीशी फोनवर संवाद साधला तेव्हा आकाशने फोन उचलून, ‘तू माझ्या घरी का गेला? मी तुझ्याकडे बघतोच आता. तुझे सोन्याचे दागिने आता परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर, पोलिसांत जरी गेला तरी मला फरक पडणार नाही,’ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आकाश याने दागिने हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका खासगी फायनान्सकडे गहाण ठेवल्याची माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

Khed Shivapur Toll : शिवापूर टोल नाक्यावर गणेशभक्तांना टोलमाफी; २४ तासांत सात हजार वाहनांना सवलत

Latest Marathi News Updates : २९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन

Dombivli News : आधी वाहतुक कोंडी आणि त्यातच कल्याण-शीळ रोडवर मोठा दिशा दर्शक फलक अचानक कोसळला...

Cricketer Accident: क्षणात संपलं आयुष्य! भारतीय क्रिकेटरचा थरारक अपघातात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा

SCROLL FOR NEXT