पुणे

यशवंत साखर कारखान्यामधील स्थलांतरित कामगारांची नावे काढा

CD

उरुळी कांचन, ता. ३१ : काही दिवसांपूर्वीच पूर्व हवेलीतील थेऊर गावात अनेक मतदारांची नावे चक्क दुसऱ्याच मतदारसंघात बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद माळी आणि मनसे संघटक प्रशांत खांडे यांनी १५ वर्षे बंद असलेल्या यशवंत साखर कारखान्यातील कामगाराची नावे अजूनही यादीत असल्याची माहिती उघड केली आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या लेखी निवेदनानुसार, थेऊर (ता. हवेली) येथील बाहेरील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांची नावे अनेक वर्षापासून मतदार यादीमध्ये आहेत, पण ते गेल्या १० ते १५ वर्षापासून गावात राहत नाही, अशा स्थलांतरित नावे स्थानिक पडताळणी व पंचनामे करून वगळण्यात यावी. तसेच, येथील यशवंत कारखाना बंद होऊन १५ वर्षे झाली आहेत. तेथील कामगार वर्ग हा थेऊर गावात व कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये राहत होता. आज तेथील कामगार वसाहत देखील रिकाम्या आहेत आणि येथील कामगार आपापल्या मूळ गावी स्थलांतरित झालेले असून, त्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.
जे आज त्यांच्या मूळ गावी देखील मतदार आहेत. तसेच, थेऊरमध्येही त्यांची नावे मतदार यादीत आहेत. यातील बरेच लोक त्यांच्या गावांत सरपंच, तसेच विविध पदावर आहेत. असे असताना या बाहेरच्या लोकांनी आमच्या थेऊर गावचा सरपंच ठरविणे लोकशाहीत योग्य आहे का? अशा लोकांमुळे लोकशाहीची जगजाहीर हत्या होत आहे व स्थानिक मतदारांवर उमेदवारांवर अन्याय होत आहे. तरी थेऊर येथील सर्व स्थलांतरित मतदारांचे संबंधित बीएलओ यांच्यामार्फत स्थानिक पंचांच्या मदतीने पंचनामे करून थेऊर गावात राहत आहेत किंवा नाहीत याची खात्री करून ही दुबार नावे काढून टाकावी किंवा स्थलांतरित करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT