पुणे

किरकटवाडीत दुमदुमला पालखी सोहळा

CD

खडकवासला, ता. ६ : महापालिकेच्या किरकटवाडीतील शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेपासून गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखी काढली होती. शाळेच्या ढोल-ताशा आणि लेझीम पथकाने भव्य सुरुवात करत ‘विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठला’च्या गजरात परिसर दुमदुमून गेला.
पालखी फुलांनी सजवलेली होती. सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते. विद्यार्थिनींनी नऊवारी नेसली होती. विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी विद्यार्थी हरिभजनात रंगले होते. मंदिराच्या दिशेने सोहळा निघाला. संत परंपरेचे दर्शन घडविणारा पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला माजी सरपंच गोकूळ करंजावणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बांदल, सदस्य प्रवीण दिघे, जयश्री पठारे, दीपाली सावंत आदींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संगीता कुरुणकर व काकासाहेब वाळुंजकर, हनुमंत रणदिवे, अमोल शेलार, मंगेश खंडाळीकर, विश्‍वजीत जगदाळे, कृष्णा कामठे, संतोष सरोदे, उमेश चाबके, करण भांगरे, युवराज राठोड, शैलेंद्र कांबळे या शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Raid : पुण्यात पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री? मनविसे ने बंद पाडली फ्रेशर्स पार्टी, अर्ध्या रात्री नेमकं काय घडलं?

Pune Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

SCROLL FOR NEXT