पुणे

वीसगाव खोऱ्यातील कांदा पीक धोक्यात

CD

उत्रौली, ता६ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील खानापूर, उत्रौली, भाबवडी, कान्हवडी, हातनोशी या परिसरात गेले महिन्याभरापासून कांदा लागवड केली जात आहे. गेली चार दिवस धुके आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. धुक्यामुळे कांद्याची पात पिवळी पडून रोपांची मर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात धुकेमय वातावरण राहिल्यास दुबार कांदा लागवडीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहणार आहे.

धुक्यामुळे कांद्यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीवर अधिक खर्च करावा लागत आहे.
कांदा पिकांबरोबरच ज्वारी, पावटा, गहू, हरभरा यावर थंडी व धुक्याचा विपरीत परिणाम होत आहे.

यंदा कांदा लागवड करून महिना झाला.कांदा पीक जोमात होते परंतु गेली चार दिवस ढगाळ वातावरण, धुके पडत असल्याने कांदा पात पिवळी पडत आहे.त्याचा परिणाम कांदा पिकाच्या वाढीवर होत आहे.
पोपट मालुसरे, प्रयोगशील शेतकरी खानापूर (ता.भोर)

पंधरा लिटरसाठी बुरशीनाशक साफ ३० ग्रॅम, कीटकनाशक कराटे १५ मिली, टॉनिक-इसाबियोन ३० मिली याप्रमाणे औषधांचे प्रमाण वापरून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार स्टिकर पाच ते १० मिली वापरावे. डोळे, तोंड, डोके यासाठी सुरक्षित साधनांचा वापर करून सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेत फवारणी करावी. कडक उन्हात फवारणी करणे टाळावे.
- अमृत मोहिते, सहाय्यक कृषी अधिकारी, खानापूर (ता.भोर)
00009

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT