निसर्ग सौंदर्याने नटलेला, वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे असलेले गडकोट किल्ले, सह्याद्रीच्या डोंगररांगा, पावसाळ्यात खळखळून वाहणारे धबधबे, प्राचीन मंदिरे, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आदींमुळे भोर तालुका भूतलावरील स्वर्गच ठरला आहे. तालुक्यातील वीसगाव खोऱ्यामधील
रोहिडेश्वर किल्ला पर्यटक, शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये किल्ल्यांवर राज्याभरातून पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
- दीपक येडवे, उत्रौली
पुणे शहरापासून दीड तासाच्या अंतरावर भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील दुर्ग रोहिडा इतिहासाची साक्ष देत डौलाने उभा आहे. बाजारवाडी हद्दीतील दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला गिर्यारोहक, पर्यटक, शिवप्रेमींना भुरळ घालीत आहे. भक्कम तटबंदी, बुलंद दरवाजा, अभेद्य सुरक्षा व्यवस्था, अजिंक्य बुरूज लाभलेला किल्ला म्हणजे रोहिडेश्वर होय. हिरव्यागार वेली, फुलांचे मनमोहक दृश्य, धबधबे, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
रोहिडेश्वरला कसे जायचे?
रोहिडेश्वर किल्ला पुणे ते भोर अंतर ५१ किलोमीटर.
वीसगाव खोऱ्यात भोरच्या दक्षिणेस ९ किलोमीटरवर बाजारवाडी आहे.
पुण्यावरून कापूरव्होळ, भोर, खानापूरमार्गे बाजारवाडी येथे साधारण दीड तासात पोचतात.
गडावर पाहण्यासाठी ठिकाणे
- पहिल्या दरवाजाच्या चौकटीवर गणेशपट्टी, मिहराब
- दुसरा दरवाजा समोरच पाण्याचे भुयारी टाके
- तिसरा दरवाजा भक्कम, सुरेख कोरीव काम, दोनही बाजूंस हत्तीचे शीर, शिलालेख
- दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात
- गडावर सदर, किल्लेदाराचे घर, रोहिडमल्ल ऊर्फ भैराबाच्या मंदिर, लहानसे टाके, दीपमाळ, चौकोनी थडगी, चुन्याचा घाणा, टाक्यांची सलग रांग,
एक भूमिगत टाके
- मानवी मूर्ती, शिवपिंडी
- शिरवले बुरजाजवळ भुयार, वाघजाई बुरजा शेजारी चोर दरवाजा, पाटणे बुरूज, दामगुडे बुरूज, वाघजाई बुरूजाखाली वाघजाई मंदिर, फत्ते बुरूज, सदरेचा बुरूज
-गडाची तटबंदी, बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत
- किल्ल्याची उंची ३६६० फूट
- गडावरून मांढरदेवी, रायरेश्वर, तोरणा, पुरंदर, राजगड, राळराशी, केंजळगड,
वीर धरण, भाटघर धरणाचे विहंगम दृश्य दृष्टिपथात
- राज्य संरक्षित स्मारक
गडावर सोईसुविधा
- विश्रामगृहाचे काम अंतिम टप्प्यात
-म्युझियम, कार्यालय, दोन शयन कक्ष, स्वयंपाकाची खोली, स्वतंत्र स्वच्छतागृह, मोठा सभागृह
-गाड्यांसाठी वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सोय
-विश्राम गृहाजवळ उत्तम, रुचकर भोजनाची व्यवस्था
-ऑनलाइन बुकिंग
दुर्ग संवर्धन
दुर्गसंवर्धन परिवार टीम हडपसर, सह्याद्री प्रतिष्ठान टीम हडपसर, भोर, बारा मावळ सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी, चिंचवड, पुणे विभाग शिव शंभू प्रतिष्ठान, शिवभारत परिवार, गड दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान यांनी हनुमान मंदिर जीर्णोद्धार, टाक्यांची सफाई, ध्वज बसवणे, वीरगळ संवर्धन, स्वच्छता मोहीम, कॅमेरे, सौर संचलित माहिती साउंड, टीव्ही अशी कामे केली आहेत.
किल्ल्याचा इतिहास
यादवकालीन बांधकाम
१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांदल-देशमुखांकडून
किल्ला जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला.
छत्रपती शिवरायांची व बाजी प्रभू देशपांडे भेट
मोगलांचा ताबा, पुनर्विजय
पुरंदरच्या तहानुसार (१६६५) किल्ला मोगलांच्या ताब्यात
१६७० मध्ये स्वराज्यात
किल्ले रोहिडेश्वर
- महादरवाजा
- तळं
- बुरूज
- शिलालेख
जवळ असलेली ठिकाणे
- नेकलेस पॉइंट
- भाटघर धरण
- पाले येथील शिव कालातीत न्याय निवाडे केलं जाणारे अमृतेश्वर मंदिर,
- धावडी खिंडीतील नवसाला पावणारा गणोबा मंदिर
- उत्रौलीतील पांडवकालीन उत्रैश्वर मंदिर
- आंबाडे येथील जानुबाई मंदिर
00083, 00081, 00086, 00087
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.