पुणे

धोम बलकवडी कालव्याची गळती थांबवा

CD

उत्रौली, ता. १३ : धोम बलकवडी धरणातील उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले असून भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील पोळवाडी, जेधेवाडी, गोकवडी तसेच आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव, रावडी, कर्नावड या गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे जमीन पाणी असूनही पिकविता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाटचारीची दुरवस्था झाली आहे. येथे त्वरित कालव्याची दुरुस्ती करून गळती थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या परिसरात रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, पावटा, हरभरा, गहू ही पिके घेतली जातात. गळतीमुळे शेतात पाणी साचते तसेच पाणी आटले तरी जमिनीत ओलावा रहात असल्याने जमिनीला वाफसा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक घेताना अडचणींना सामोरे जावे लागते. सदर गळती दुरुस्ती करिता शेतकऱ्यांनी मागणी केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

कालव्यातून पाणी सोडल्यावर पाणी गळतीमुळे घराखालून उपळे निघतात. शेतात पाणी साचत असल्याने कोणतेही पीक घेता येत नाही. तरी कालव्याला काँक्रीटचे अस्तरीकरण करण्यात यावे.
-अजित पोळ, शशिकांत जेधे, शेतकरी

धोम बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे उर्वरित अस्तरीकरण शासकीय मान्यतेचा प्रस्ताव कार्यवाहीत असून पाटचारीचे अस्तरीकरण किंवा बंदिस्त नलिका प्रस्ताव पाठविण्यात येईल. योग्य तो पाठपुरावा करुन कालव्याची गळती थांबविण्यात येईल.
-अक्षय ताकवणे, सहाय्यक अभियंता श्रेणी १, धोम बलकवडी प्रकल्प उपविभाग क्र. ४ खंडाळा

*कालव्याच्या गळतीमुळे होणारे परिणाम
-जमिनीची धूप झाल्याने शेतजमीन नापीक
-डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका
-परिसरातील शेती, रस्त्यांवर पाणी साचते
-अतिरिक्त पाण्यामुळे पिकं कुजतात
-पाण्याची नासाडी
-कालव्याचा भराव कमकुवत


गळतीवर उपाय :
-कालव्यास कॉंक्रिटचे अस्तरीकरण
-नियमित तपासणी व दुरुस्ती
-पॉलिमर सीलंट वापर
-रिटेनिंग वॉल बांधणे
-कालव्याची नियमित साफसफाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT