पुणे

सौर ऊर्जेवरील भोंग्यामुळे पिकांचे संरक्षण

CD

उत्रौली, ता. १५ : बालवडी (ता.भोर) येथील शेतकरी सुरेश किंद्रे यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी युक्ती म्हणून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भोंग्याचा वापर केला आहे. मोठ्या आवाजात रात्रभर कुत्री भुंकण्याचा आणि माणसे ओरडण्याचा आवाज येत असल्याने रानडुकरांसह वन्यप्राणी घाबरून शेतापासून दूर राहत आहेत. यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे संरक्षण होत आहे. तसेच मनुष्य, पाळीव प्राण्यांची होणारी हानी थांबली आहे.

भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे रब्बीतील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीच्या परिरात जंगल वाढल्याने रानडुक्कर, हरिण, लांडगा, मोर, तरस या प्राण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून वीसगाव खोऱ्यात भेकर, रानडुक्कर, मोर यासारखे वन्यप्राण्यांकडून शेतामधल्या पिकांची नासधूस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कळपाने शेतात येऊन रानडुक्कर आणि वन्यप्राणी धुडगूस घालत आहेत. खाणे कमी नासधूस मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे हातातोंडाशी आलेल पीक डोळ्यासमोर आडवे झाल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. नासधुसीत पीक वाया जात असल्याने आर्थिक नुकसानीने शेतकरी हताश होतोय. त्यामुळे शेतातली पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना असे विविध उपाय करावे लागत आहे. या लावलेल्या यंत्रामुळे शेतकरी काही प्रमाणात त्यांचं शेतांचे संरक्षण करण्यात यशस्वी ठरत आहे, असे असले तरीही वनविभागाने यामध्ये ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
00162

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT