उत्रौली, ता. ४ : कापूरहोळ-भोर-मांढरदेवी-वाई या ४५ किमी मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा रस्ता पुण्याकडून वाई, महाबळेश्वरला जाण्यासाठी एक जवळचा पर्याय आहे. यामुळे या मार्गावर रहदारी वाढली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिशादर्शक फलकावर चुकीची माहिती लिहिलेली निदर्शनास आली आहे. यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे.
सध्या मांढरदेवी काळूबाईच्या यात्रेबरोबर भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील यात्रा सुरू आहेत. या यात्रेनिमित्त वाहनांची संख्या वाढली असून भाविक, प्रवासी, नवख्या वाहनचालक या चुकीच्या लावलेल्या फलकामुळे त्यांचा प्रवास भरकटत असून वेळ, पैसा, श्रम, मनस्ताप याला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
नेरे (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गिरिराज हॉटेल शेजारील मांढरदेवी-भोर रस्त्याच्या कडेला पुणे-भोर-सातारा असा बोर्ड लावला असून सर्व ठिकाणांच्या बाणाची दिशा उत्तरेकडे दाखविल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. संबंधित ठिकाणच्या दक्षिणेस सातारा आणि उत्तरेस भोर, पुणे आहे. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी चुकीची माहिती लिहिलेले दिशादर्शक फलक लावल्याचे निदर्शनास आले आहे.
रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने दिशादर्शक फलक लावल्याने अनेकवेळा रस्ता चुकत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. लावलेल्या दिशादर्शक फलकावरील माहिती ऐवजी योग्य दिशा दाखविणारी माहिती फलकावर लिहावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.