उत्रौली, ता. १७ : आंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (ता. १७) खाऊ गल्ली आणि आनंदी बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. ओली भेळ, इडली, डोसा, पाणीपुरी, कांदा भजी, डोकळा, वडापाव, अप्पे, बासुंदी, कोकम सरबत, लिंबू सरबत, तसेच भाजीपाला आदी पदार्थांची दुकाने थाटली होती. विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, महिला पालक उपस्थित राहात विविध पदार्थांची खरेदी करत पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
खाऊ गल्लीत विद्यार्थ्यांनी बनवलेले चविष्ट आणि घरगुती पदार्थ होते, विद्यार्थी पदार्थांची किंमत ठरवतात आणि विक्री करतात,त्यामुळे भावी उद्योजक घडवण्याचे धडे मिळतात. व्यवहाराचे ज्ञान, संघभावना निर्माण व्हावी, म्हणून बाल बाजाराचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक राजू कारभळ यांनी दिली.
या उपक्रमास केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक खोपडे यांनी भेट दिली. मुख्याध्यापक राजू कारभळ, शरद पवार, राजेंद्र पडवळ, राजश्री रायकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.