पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्यांचा मृत्यू

CD

उत्रौली, ता.१७ : निळकंठ (ता.भोर) येथील शेतकरी शिवाजी आनंदा राऊत, गोपाळ रघुनाथ राऊत यांच्या मध्यवस्तीतील घराच्या पडवीत बांधलेल्या दोन बकऱ्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१७) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे.

गोपाळ राऊत यांना पहाटे तीनच्या सुमारास जाग आल्यावर पडवीत गेले असता, त्यांना दोन्ही बकऱ्या मृत अवस्थेत आढळल्या. बकऱ्यांच्या मानेवर जखमा दिसल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांची खात्री पटली. बिबट्याने पडवीला असलेल्या खिडकीतून प्रवेश केला. ही घटना गावच्या मध्यवस्तीत घडल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, तातडीने वनविभागाकडून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घटनेचा पंचनामा साहाय्यक वन संरक्षक शीतल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वनपाल सुग्रीव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संदीप शिवले, सुभाष गायकवाड, वनमजूर ऋणेश गोरडे, पोलिस पाटील राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्याच्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत पकडला; सरकारी वाहनात मद्यपानाचा प्रकार उघड; Video Viral

Imran Khan यांच्याशी जेलमध्ये नीट वागा! गावसकर, कपिल देवसह 'या' दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र...

Ajit Pawar Plane Crash: ''ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम'', बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

JEE Main Exam Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील माधव विराडिया अव्वल

Nagpur Property Tax : नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार? निवडणूक होताच मनपा मालमत्ता कर वाढण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT