पुणे

असेल मी, नसेन मी, सुलेखनातून दिसेल मी

CD

उत्रौली, ता. २६ : मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, तिची समृद्धी टिकून राहावी आणि तरुण पिढीला मातृभाषेचे महत्त्व समजावे, या करिता सुलेखनकार अमित भोरकडे सुलेखनातून मराठी भाषेचे सौंदर्य खुलविण्याचे काम करीत आहेत. सुलेखनकार लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषेतील सुंदर विचार आपल्या कागदावर रेखाटतात आणि समाज माध्यमावर पोहचवितात.
‘असेल मी, नसेन मी सुलेखनातून दिसेल मी’ असा सुलेखनाचा वसा घेतलेले भोर येथील सौ. निर्मलाताई थोपटे अध्यापक विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिक्षक असून सुलेखनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य खुलविण्याचे कार्य ते निष्ठेने करतात. साधुसंतांचे अभंग, देशभक्तिपर गीते, साहित्यिकांचे विचार, कवितांचे आकर्षक सुलेखन ते समाजमाध्यमांवर सादर करतात. देशविदेशातील मराठीप्रेमी त्याला दाद देतात.
प्रसिद्ध सुलेखनकार कै. कमल शेडगे, पद्मश्री अच्युत पालव यांनी मराठी सुलेखनाचा झेंडा सातासमुद्रापार रोवला. त्याच परंपरेत भोरकडे यांच्या प्रयत्नांमुळे मराठी सुलेखनाची चळवळ वाढत असून नव्या पिढीला मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सुरू आहे. भोरकडे यांनी ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवरील शिक्षकांना सोबत घेत ‘माझी शाळा माझा फळा’ या समूहाच्या माध्यमातून सुलेखनाची चळवळ ग्रामीण भागात रुजवली. शाळेतील फळ्यावर सण-समारंभाचे सुंदर लेखन करून शाळेतील नव्या पिढीला आपल्या भाषेचा आणि लिपीचा अभिमान वाटावा यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अनेकांना मराठी सुलेखनाचे धडे देण्यास सुरुवात केली.
भोरकडे या समूहाच्या माध्यमातून दरवर्षी ‘मराठी अक्षर संमेलन’ आयोजित करतात. राज्यभरातील सुलेखनकार एकत्र येऊन आपली कला सादर करतात. मराठी अक्षरांचा उत्सव साजरा करताना भाषेचा वारसा अधिक दृढ करतात. माझी शाळा माझा फळा या समूहातील श्रीकांत गवांडे, हेमंत घरत, अनिल गोवळकर, अशोक सोनवणे, प्रमोद देठे, एकनाथ नाईकवाडी, गुरुप्रसाद शिंदे, रामराव भगत, प्राणजीत बोरसे, अश्‍विनी वाडेकर, मनीषा कदम, मनीषा येडवे, राजाराम टपळे, माणिक पासलकर, जीवन पोवळे, विश्‍वास निकम, अजय कोठावळे, काळूराम धाडवे, विनायक सुरसे असे अनेक सुलेखनकार रोज नवनवीन मराठी विचारांचे सुलेखन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT