पुणे

मोहोर गळाल्याने आंबा उत्पादक संकटात

CD

उत्रौली, ता. ५ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. त्याचबरोबर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंब्यांच्या झाडांवर हवामान बदल, ढगाळ वातावरण, चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडले आहे. उत्पादन घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. यंदा थंडीचे प्रमाणात चांगले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्यांना मोहोर लगडला होता. आंब्यांचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मागील दोन आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर झडून गेला. यातून वाचलेल्या मोहाराचे रुपांतर आंब्यात होत असताना चिकटा रोगामुळे फळ गळती झाल्याने या हंगामात आंब्याचे ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे आंबा उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग संकटात सापडला आहे.

उन्हाच्या झळांमुळे गुणवत्तेवर परिणाम
भोर तालुक्यात सद्या दिवसाचे तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसचे असते. तापमानामुळे गोटीच्या आकाराचे आंबे पिवळे होऊन फळ गळती होत असून देठाजवळ काळे डाग पडलेला आंब्यांची फळे गळून पडत आहे. यामुळे हापूस, केसर, गावरान आंबे याचे उत्पादन घटू शकते. उन्हाच्या झळांमुळे आंब्यांचा गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करा
तुडतुडे, मावा ही कीड झाडाचा रस शोषण पानांवर आणि मोहरावर चिकट पदार्थ सोडते. ज्यामुळे काळी बुरशी येऊन प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते. मोहोर आणि लहान फळे मोठ्या प्रमाणात गळून पडतात तसेच झाडाची वाढ खुंटते. किडीवरील नियंत्रणासाठी पहिल्या फवारणीत इमिडाक्लोप्रिड (०.५ मि.ली. प्रतिलिटर पाणी) आणि दुसऱ्या फवारणीत थायामेथोक्झाम (१ ग्रॅम) वापरावे. झाडाच्या फांद्यांची छाटणी करून बागेत हवा खेळती ठेवावी. पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करावा, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
00355, 00354

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT