पुणे

गॅस दरवाढीमुळे चुली पुन्हा पेटल्या

CD

उत्रौली, ता. ११ : आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचे बजेट कोलमडले आहे. महागलेला गॅस परवडत नसल्याने भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील महिलांनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली असून, यामुळे गावात पुन्हा धुराचे साम्राज्य पसरू लागले आहे.
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागात गॅस पोहोचला आणि चुली बंद झाल्या होत्या. मात्र, आता घरगुती सिलिंडरचे दर वाढल्याने आणि मजुरीची कामे नियमित नसल्याने सिलिंडर भरणे सर्वसामान्यांना अशक्य झाले आहे. परिणामी, महिलांनी जनावरांच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या, कोळसा आणि सरपणाचा वापर सुरू केला आहे. रॉकेल उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर करून चूल पेटवली जात आहे, जे आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील शेतीला पूरक व्यवसाय पशुपालनाचा केला जातो, जनावरांच्या शेणापासून तयार केलेली गवऱ्या चुलीसाठी वापरून महिला आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच गॅसचे दर ६० रुपयांनी वाढल्याने आणि गॅस संदर्भातील अफवांमुळे गृहिणींच्या चिंतेत भर पडली आहे.युद्ध समाप्ती होऊन ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर जो पर्यंत येत नाही तोपर्यंत महिला गॅसपासून दूर राहणे पसंत करीत आहेत.

ही आहेत प्रमुख कारणे
कामाची नसलेली हमी
महागाईचा भडका
बंद पडलेले उद्योगधंदे
गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती

ग्रामीण भागातील महिला,गृहिणी तुटपुंज्या खर्चात घर प्रपंच भागवत असताना इंधन,गॅस दर वाढल्याने शासनाने गॅस वरील अनुदान सुरु करावे.ग्रामीण भागातील महिला वर्ग जून ते सोनं या म्हणी प्रमाणे चुलींवरील स्वयंपाकांना पसंती देत आहेत.
- हिराबाई मांढरे, धनावडेवाडी (ता. भोर)


आमचा कुंभार कामाचा परंपरागत व्यवसाय आहे,घरोघरी गॅस आल्याने गेली १० वर्ष चुलींची मागणी घटली होती‌‌.गॅस दर वाढीने महिला वर्गांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा कल वाढल्याने चुलींची मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- राजाराम कुंभार,कुंभारकाम व्यावसायिक, उत्रौली (ता. भोर)

0380

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT