पुणे

उत्रौलीत महारुद्र हवन, दुग्धाभिषेक

CD

उत्रौली, ता. २१ : उत्रौली (ता. भोर) येथे किर्वे परिवारातर्फे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन उत्साहात पार पडला. यानिमित्त स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन, महारुद्र हवन, दुग्धाभिषेक, होमहवन, गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आवर्तने, महिलांचे महारुद्र पठण या कार्यक्रम आयोजन करण्यात आले.
शुक्रवारी (ता. २०) पहाटे श्रींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणि प्रतिमेस आकर्षक सजावट करण्यात आली. केंद्रामार्फत उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रांगोळीकार सुयोग खाडे यांची कार्यशाळा तसेच जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना वर्तमानपत्र सुरू करण्यात आली.
सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत महाराजांच्या आरतीचा सोहळा पार पडला. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दीपाली खाडे, रोहन किर्वे, नम्रता किर्वे, योगेश मल्हारी, आकाश शिंदे, हेमंत खाडे, योगेश शेडगे आणि ग्रामस्थांनी नियोजन केले. या प्रसंगी स्वामी महाराजांचे सेवेकरी, भाविक उपस्थित होते. स्वामींची नित्यसेवा रोहन किर्वे यांच्या हस्ते करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या SIT चौकशीला सुरुवात

Ganesh Naik: बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन, गणेश नाईक यांनी सर्वच सांगितलं

SCROLL FOR NEXT