पुणे

वडगावला वादळी वारा, गारपिटीचा तडाखा

CD

उत्रौली, ता. ३० : वडगाव डाळ (ता. भोर) येथील यात्रेला आवश्यक असलेल्या जिन्नस जमवून घरात ठेवण्याची लगबग ग्रामस्थांची सुरू असताना सोमवारी (ता.३०) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा आणि गारांच्या पावसामुळे अनेकांच्या घराच्या छपराचे पत्रे उडाले. भिंती कोसळल्या, झाडे उन्मळून पडली. घरात आणि गोठ्यात पाणी शिरल्याने अन्नधान्य व यात्रेच्या वस्तू भिजून मोठे नुकसान झाले.

वडगाव डाळ गावाची यात्रा मंगळवारी (ता.३१) बुधवारी (ता.१) या दरम्यान आहे. संपूर्ण गावात यात्रेची तयारी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला निमंत्रण देण्यात ग्रामस्थ मग्न होते.
दरम्यान, निर्मला योगेश निकम यांच्या तोंडाला आणि योगेश निकम यांच्या डोक्याला व पाठीला दुखापत झाली. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेला मंडप गारांच्या वजनाने कोसळला. रस्त्यावर गारांचा सडा पडला होता. यामुळे यात्रेचे वातावरण शांत झाले.

ग्राम महसूल अधिकारी राजेश जाधव यांनी केलेले पंचनामे
१. योगेश निकम यांचे घराचे वीस पत्रे, टीव्ही, फ्रिज, चार पोती गहू, कुलर, गिरणी, सुरेश निकम यांचे ७ पत्रे, तांदूळ, विलास निकम २ पत्रे, उत्तम निकम २ पत्रे, ज्ञानोबा निकम २ पत्रे, अशोक शिंदे २४ पत्रे
२. संजय महाले यांच्या भिंतींना तडे, कौले, टीव्ही, फ्रीज, गहू, तांदूळ, ज्वारी प्रत्येकी एक पोते भिजले.
३. विजय चव्हाण यांच्या दुमजली घराचा वरचा भाग उडाला. २५ पत्रे, गहू एक पोते, तांदूळ दीड पोते, खिडक्या, स्लॅबला भेगा पडल्या.
३. सुरेश गायकवाड यांचे संपूर्ण छत, कौले उडाले, भिंती पडल्या, गहू १ पोते, ज्वारी २ पोती, तांदूळ ४ पोती,
४. शिवाजी खोपडे गोठ्यात पाणी शिरले, भिंत वाहून गेली,‌ २०० कडबा भिजला.
६. दत्तात्रेय बरदाडे यांच्या घरावर दुसऱ्याचे छप्पर पडल्याने घराचे नुकसान,
७. सुमन बर्के यांच्या घरावर झाड पडले.
८. राजेंद्र डाळ यांच्या घरात पाणी शिरल्याने गहू, ज्वारी, शालेय पुस्तके भिजली,

रानमेव्यासह आंबा, फणसाला गारांचा तडाखा
वादळी वारा व गारांच्या माऱ्याने डोंगरची काळी मैना (करवंदे ),जांभळे यांना आलेली फुले झडून गेल्याने काळी मैना, जांभळे हा रानमेवा तसेच आंबा, फणस ही फळांचे गारांमुळे मोठे नुकसान झाले.

00452

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT